छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च (हिं.स.) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने बुधवारी जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. वाचक आणि ग्रंथप्रेमींना ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ खरेदीची संधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च (हिं.स.) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने बुधवारी जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. वाचक आणि ग्रंथप्रेमींना ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ खरेदीची संधी तसेच विविध परिसंवाद आणि वैचारिक मेजवानीचा लाभ मिळणार आहे.

सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांच्या माहितीनुसार, ग्रंथोत्सवाचे उद्घाटन समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे होईल. उद्घाटनास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर असतील.

सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मागास वर्ग बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड आणि खा. संदिपान भुमरे उपस्थित राहतील.

ग्रंथोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रंथालये या विषयावर परिसंवाद आयोजित केला जाईल. अध्यक्षस्थानी डॉ. रा. शं. बालेकर असतील, तर वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, डॉ. गणेश कुलकर्णी आणि प्रा. अनिल लहाने आपले विचार मांडतील.

तसेच दुपारी ४ वाजता काव्यवाचन सत्र आयोजित केले जाईल, अध्यक्षस्थानी प्रा. ललित अधाने असतील. यात विष्णू सुरासे, हबीब भंडारे, देवानंद पवार, माधुरी चौधरी, सिंधू क्षीरसागर, कावेरी खरात, धम्मपाल जाधव हे कवी सहभागी होतील. तसेच गजल यात्रा कार्यक्रमात रमेश ठोंबरे, गिरीश जोशी, ऋषभ कुलकर्णी, अर्जुन गायकवाड, अमेय तांदुळजे सहभागी होतील.

त्यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न होईल.------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande