लातूर : आंतरविद्याशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
लातूर, 24 मार्च, (हिं.स.)। उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने ''सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या वारशाचा आढावा : राष्ट्रीय एकात्मता, सर्वसमावेशक शासन आणि त्यांची आधुनिक भारताची
उदगीर


लातूर, 24 मार्च, (हिं.स.)। उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने 'सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या वारशाचा आढावा : राष्ट्रीय एकात्मता, सर्वसमावेशक शासन आणि त्यांची आधुनिक भारताची संकल्पना' या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक 28 मार्च 2026 वार शनिवार रोजी करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उद्घाटक म्हणून चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूट, गांधीनगर येथील प्रोफेसर डॉ. राजेश चव्हाण तर बीजभाषक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल विश्वविद्यालय, गुजरात येथील प्रोफेसर डॉ. वसंत पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर असणार आहेत. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. आय. शेख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

टेक्निकल सेशनमध्ये साधन व्यक्ती म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील प्रोफेसर डॉ. बालाजी चिरडे, पीपल्स कॉलेज, नांदेड येथील डॉ. अभय दातार, यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील प्रोफेसर डॉ. शिवराज बोकडे यांचे विशेष मार्गदर्शन असणार आहे. दिनांक 28 मार्च 2026 रोजी होणाऱ्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. के. आर. गव्हाणे, राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande