पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली , 24 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला. याआधी २२ मार्च रोजी पं
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक


नवी दिल्ली , 24 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला. याआधी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली होती, ज्यामध्ये ऊर्जा आणि खत पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सध्याच्या सुरक्षा परिस्थिती आणि ऑपरेशनल तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आता चौथ्या आठवड्यात प्रवेशला आहे. यामुळे होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या व्यापारावर परिणाम झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर तणाव आणखी वाढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने खाडी प्रदेशातील अमेरिकन आणि इस्रायली ठिकाणांना लक्ष्य केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठ आणि जागतिक आर्थिक स्थैर्यावर दबाव वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. त्यांनी नमूद केले की हा संघर्ष केवळ आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेपुरता मर्यादित नसून मानवीय स्तरावरही मोठे आव्हान निर्माण करत आहे. भारताच्या कच्च्या तेल आणि वायूच्या गरजांचा मोठा भाग या प्रदेशातून पूर्ण होत असल्याने, तसेच जागतिक व्यापारासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande