नाशिक महिला प्रीमिअर लीग साठी 28 मार्च रोजी निवड चाचणी
नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - तर्फे नाशिकमधील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Nashik Women Premier League (NWPL) आयोजित करण्याचा महत्त्वप
नाशिक महिला प्रीमिअर लीग साठी 28 मार्च रोजी निवड चाचणी


नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - तर्फे नाशिकमधील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Nashik Women Premier League (NWPL) आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एन डी सी ए तर्फे नाशिक महिला प्रीमियर लीग (NWPL) चे अधिक तपशीलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे :

२८ मार्च - निवड चाचणी , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान. ( फक्त नाशिक जिल्ह्यातील खेळाडू )

११ एप्रिल - सहभागी संघांचे आयकॉन खेळाडू निवड १२ एप्रिल - खेळाडू लिलाव प्रक्रिया , २५ एप्रिल ते १ मे - स्पर्धेतील सामने, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान

नाशिकमधील महिला क्रिकेटच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात सुमारे १५० महिला क्रिकेटपटू सक्रियपणे क्रिकेट खेळत आहेत. या खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव, व्यावसायिक वातावरण आणि मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी या उद्देशाने नाशिक महिला प्रीमियर लीग आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत ५ फ्रँचायझी संघ सहभागी होतील. स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार असून त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल. संपूर्ण स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande