लातूर - १३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुण्यातून अटक
लातूर, 25 मार्च (हिं.स.)लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपींच्या शोधासाठी सातत्याने विशेष मोहिम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मागील तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेला आणि विविध गंभीर गुन्
फरार आरोपी


लातूर, 25 मार्च (हिं.स.)लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपींच्या शोधासाठी सातत्याने विशेष मोहिम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मागील तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेला आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी पुणे येथून जेरबंद करण्यात आला आहे. पोलीस ठाणे किल्लारी येथील गुरनं. 45/2013 कलम 376 भादंवि, गुरनं. 59/2017 कलम 307,353, 333, 506 भादंवि तसेच पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर येथील गुरनं. 196/2013 कलम 224 भादंवि या गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी दयानंद पांडुरंग देडे (वय 36 वर्षे, रा. नांदुर्गा ता. औसा जि. लातूर) हा मागील १३ वर्षांपासून फरार होता.

पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सर्जेराव जगताप यांनी आपल्या पथकासह आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या पथकामध्ये साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, मनोज खोसे, शैलेश सुडे यांचा समावेश होता.

प्रथम आरोपीच्या मूळ गावी मौजे नांदुर्गा, ता. औसा येथे शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी आरोपी सध्या पुणे येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ हालचाल करत पुणे येथे जाऊन गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

सखोल तपास व नियोजनपूर्वक केलेल्या कारवाईदरम्यान आरोपी हा नागेश्वर कॉलनी, मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथे आढळून आला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले.

सदर आरोपी हा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दीर्घकाळापासून फरार असल्याने त्याचा शोध घेणे पोलीस दलासमोर मोठे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिकाटी, गुप्त माहितीचे अचूक विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास पोलीस ठाणे किल्लारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande