लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
लातूर, 25 मार्च, (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. लातूर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल


लातूर, 25 मार्च, (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. लातूर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची लातूरची असून सध्या गुजरात राज्यात नोकरीला आहे. २०१६-१७ च्या सुमारास तिची ओळख लातूर येथील 'हाडको' कॉलनी परिसरातील रहिवासी खुर्शीद अफसर पटवारी याच्याशी झाली. या ओळखीचा फायदा घेऊन संशयिताने २०१८ मध्ये महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आर्थिक फसवणूक आणि धमकी

पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खुर्शीद पटवारी याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. या काळात त्याने वेळोवेळी हॉटेल व्यवसायासाठी आणि वैयक्तिक कारणांसाठी पीडितेकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि बँकांकडून कर्ज काढून लाखो रुपये उकळले. यामध्ये अंदाजे १३ तोळे सोने ज्यामध्ये नेकलेस, अंगठ्या आणि सोन्याचे मणी यांचा समावेश आहे. हॉटेल सुरू करण्याच्या नावाखाली २.५ लाख रुपये रोख. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक. तसेच पीडितेची चारचाकी गाडी (एमएच २४ एस १६२५) देखील कामासाठी नेऊन परत केली नाही.

बदनामीची भीती आणि छळ. . .

जेव्हा पीडितेने तिचे पैसे आणि दागिने परत मागितले, तेव्हा संशयिताने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचे चारित्र्यहनन करण्याची आणि तिचे खासगी फोटो/माहिती नातेवाईकांना सांगण्याची भीती दाखवून त्याने २०२५ पर्यंत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला. अखेर या त्रासाला कंटाळून महिलेने लातूर पोलिसांत धाव घेतली.

पोलीस कारवाई

या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. लातूर पोलिसांनी खुर्शीद अफसर पटवारी याच्याविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:

कलम ६१(१): गुन्हेगारी कट रचणे. कलम ३५१(३): गुन्हेगारी धमकी देणे. कलम ३०८(५): खंडणी किंवा मालमत्ता बळकावणे. कलम ३१८(४): फसवणूक करणे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानदेव प्रल्हाद सानप हे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande