अकोला - एलपीजी गॅस भरण्यासाठी ऑटो चालकांची मोठी गर्दी!
अकोला, 25 मार्च (हिं.स.)।मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे.एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऑटो च
Photo


अकोला, 25 मार्च (हिं.स.)।मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसून येत आहे.एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऑटो चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी गॅससाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अकोला शहरातील एलपीजी गॅस पंपांवर सध्या गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे ऑटो चालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शहरातील विविध गॅस पंपांवर ऑटो रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी ही रांग दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.भर उन्हात चालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन कमाईवरही मोठा परिणाम होत आहे. अनेक चालकांनी गॅस वेळेवर न मिळाल्यामुळे दिवसभराचा व्यवसाय ठप्प झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे.युद्ध परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ऑटो चालकांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande