रत्नागिरी : जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने भाजपने स्वीकाररले सहा रुग्णांचे पालकत्व
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून क्षयरोग विभागात जाऊन रुग्णांन
जागतिक क्षयरोग दिन


रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून क्षयरोग विभागात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच सहा रुग्णांचे पालकत्व स्वीकारण्यात आले.

क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याबरोबरच रुग्णांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सौ. वर्षा ढेकणे यांनी सहा क्षयरोग रुग्णांचे पुढील सहा महिन्यांसाठी पालकत्व स्वीकारत त्यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी घेतली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. कांबळे, मेट्रो मॅडम शिरधनकर, बापट, विकास पावसकर तसेच क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी बुथ अध्यक्ष बबलू विलणकर उपस्थित होते.

वर्षा ढेकणे यांनी “टीबी मुक्त भारत” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच “आपला एक मदतीचा हात समाजासाठी खूप उपयोगाचा असतो” हा संदेश देत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande