अजित पवारांच्या अपघातात कुणाचा हात असेल, त्याचा मुडदाही खोदून काढू ! - मुख्यमंत्री
मुंबई, 25 मार्च (हिं.स.) - रोहित पवार मनात शंका ठेवू नका. अजित पवार यांच्या अपघातामध्ये जर घातपात असेल, तर आकाश-पाताळ एक करून कुणाचा बाप असला तरी शोधून काढू. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असेल; परंतु अजित पवार यांच्या अपघातामध्ये कु
मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा


मुंबई, 25 मार्च (हिं.स.) - रोहित पवार मनात शंका ठेवू नका. अजित पवार यांच्या अपघातामध्ये जर घातपात असेल, तर आकाश-पाताळ एक करून कुणाचा बाप असला तरी शोधून काढू. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असेल; परंतु अजित पवार यांच्या अपघातामध्ये कुणाचा हात असेल, तर त्याचा मुडदाही खणून काढू, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देतांना फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.

या वेळी रोहित पवार यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘अन्यांची तीव्रता कमी आहे असे तुम्ही समजू नका. तुम्ही पुढे येऊन करता, तसे नेतृत्त्व कदाचित अन्यांमध्ये नसेल किंवा ते पुढे येऊन करत नसतील. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अजित पवार यांच्याविषयी भावना नाही, असे नाही. या अपघाताच्या तपासात जे करावे लागेल ते करू. कोणत्याही परिस्थितीत काही चुकीचे होऊ देणार नाही.’’

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande