
लखनऊ, 25 मार्च (हिं.स.)।अलाहाबाद उच्च न्यायालयाने कथित शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि इतरांच्या अटकेवर स्थगिती दिली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद तसेच त्यांचे शिष्य स्वामी प्रत्यक्त चैतन्य मुकुंदानंद गिरि यांच्यासह इतर आरोपींच्या अटकेवर स्थगिती देण्याचे आदेश जारी केले.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर केली आहे.अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित या प्रकरणात प्रयागराज येथील ट्रायल कोर्टाच्या आदेशानुसार झूंसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका धर्माचार्याच्या शिष्याच्या वतीने आशुतोष महाराज यांनी कलम 173(4) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode