कोषागार कार्यालये 31 मार्चला रात्री 12 पर्यंत : भारतीय स्टेट बँक राहणार सुरु
परभणी, 25 मार्च (हिं.स.)।आर्थिक वर्ष 2025-26 अखेर अनुदान खर्ची पाडणे व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जिल्हा मुख्यालयावरील जिल्हा कोषागार कार्यालय, तालुका मुख्यालयावरील सर्व उपकोषागार कार्यालये आणि परभणी येथील भारतीय स्टेट बँक (स्टेडियम शाखा) तसेच
कोषागार कार्यालये 31 मार्चला रात्री 12 पर्यंत : भारतीय स्टेट बँक राहणार सुरु


परभणी, 25 मार्च (हिं.स.)।आर्थिक वर्ष 2025-26 अखेर अनुदान खर्ची पाडणे व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जिल्हा मुख्यालयावरील जिल्हा कोषागार कार्यालय, तालुका मुख्यालयावरील सर्व उपकोषागार कार्यालये आणि परभणी येथील भारतीय स्टेट बँक (स्टेडियम शाखा) तसेच तालुका स्तरावरील (सेलु, गंगाखेड, पाथरी, पुर्णा, जिंतूर, पालम, सोनपेठ, मानवत) भारतीय स्टेट बँकेच्या शाखा 31 मार्च रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जारी केले आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande