साेलापुरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प
सोलापूर, 27 मार्च, (हिं.स.)। होटगी रोडवरील रघोजी हॉस्पिटलविरोधात वारंवार तक्रारी येत असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. उलटी, ताप आणि थंडीने त्रस्त असतानाही वैद्यकीय नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध असल्य
साेलापुरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प


सोलापूर, 27 मार्च, (हिं.स.)। होटगी रोडवरील रघोजी हॉस्पिटलविरोधात वारंवार तक्रारी येत असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. उलटी, ताप आणि थंडीने त्रस्त असतानाही वैद्यकीय नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध असल्याचे पाहून थेट मुतखड्याची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात ४० वर्षीय प्रा. विराज भोसले यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.मृत झालेल्या प्रा. विराज भोसले यांच्या पत्नी कांचन भोसले यांनी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. माझ्या पतीवर चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला व माझ्या दोन लहान मुलांना न्याय मिळावा, अशी मागणी कांचन यांनी तक्रारीत केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande