नांदेड - वाहतुक नियम मोडणाऱ्या ३९३ वाहन चालकांवर कारवाई
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। नादे़ड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वजिराबाद वाहतूक शाखेच्या वतीने दररोज जोरदार मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३९३ वाहन चालक यांच्या विरोधात कारवाई करुन ४ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात
नांदेड - वाहतुक नियम मोडणाऱ्या ३९३ वाहन चालकांवर कारवाई


नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। नादे़ड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वजिराबाद वाहतूक शाखेच्या वतीने दररोज जोरदार मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३९३ वाहन चालक यांच्या विरोधात कारवाई करुन ४ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरात चालणारी अवैध प्रवाशी वाहतूक तसेच विना परवाना, परमिट चालणारे वाहणे, भरधाव वेगाने चालणारी वाहने, फटाका बुलेट, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणारे रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे व चाहने, यांचे वरती कार्यवाही करण्याची मोहीम राबविणे बाबत शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशीत केले होते.

वजिराबाद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदीर, वर्कशॉप, राजकॉर्नर व छत्रपती चौक या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर, ट्रिपल सिट वाहने, परवाना नसलेले वाहने, रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे, वाहने व इतर यांचेवर कार्यवाही करुन एकुण 393 केसेस करून 4 कोटी

13 हजार 500 रूपयाचा दंड आकारण्यात आला.

वाढत असलेल्या ट्राफीक मुळे लोकांनी त्यांची चार चाकी, दोन चाकी वाहने कुठेही पार्क न करता पार्कीगचे ठिकाणी पार्क करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या प्रकारे कोणतेही फळ गाडे व इतर असे रस्त्यामध्ये लावुन अतिक्रमन करू नये, सिग्नलचे पालन करावे व वाहतुकीस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा मोटार वाहन कायदा व इतर कायद्यान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल बाबत पोलीस प्रशासनाचे वतिने आवाहन करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली अधीकारी, अंमलदार शहर वाहतूक शाखा वजिराबाद, यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande