कंपनीच्या प्लांटमधून साडे२.८३ लाखांचा माल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रायगड, 28 मार्च (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत एका कंपनीच्या प्लांटमधून सुमारे २ लाख ८३ हजार ४३० रुपयांचा माल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ८ मार्च २०२६ दरम्यान पासून घडल्या चे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे खांबेव
Goods-worth-Rs-283-lakh-stole


रायगड, 28 मार्च (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत एका कंपनीच्या प्लांटमधून सुमारे २ लाख ८३ हजार ४३० रुपयांचा माल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ८ मार्च २०२६ दरम्यान पासून घडल्या चे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे खांबेवाडी, उंबरे (ता. खालापूर) येथील ब्राईट एनव्हायरमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑईल स्टोरेज कंपाउंड व डिस्टिलेशन सेटअप प्लांटमधील मोकळ्या जागेत ठेवलेला माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी कंपनीच्या कंपाउंडवरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि आर्थिक फायद्यासाठी ही चोरी केली.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गु.र. नं. 116/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(अ), 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार शिनगारे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande