
रायगड, 28 मार्च (हिं.स.) : रोहा तालुक्यातील आमडोशी गावात स्थित सुप्रीम पेट्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीत कंत्राटी कामगारांनी संगनमत करून ७० हजार रुपयांचा माल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
माहितीनुसार, कंपनीच्या वेअरहाउस शेजारील खुल्या जागेत हा प्रकार घडला. फिर्यादी, जो कंपनीत मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे, यांच्या तक्रारीनुसार कंपनीतील चार कंत्राटी कामगारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माल चोरी केला.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गु.र. नं. 66/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम 306 व 3/5 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोनकर करत आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)