अमळनेरमध्ये गावठी कट्टा हाताळताना तरुणाचा मृत्यू, परिसरात खळबळ
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना सुटलेल्या गोळीमुळे ३५ वर्षीय अरुण सुरेश महाजन याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्
अमळनेरमध्ये गावठी कट्टा हाताळताना तरुणाचा मृत्यू, परिसरात खळबळ


जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना सुटलेल्या गोळीमुळे ३५ वर्षीय अरुण सुरेश महाजन याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्याशी छेडछाड करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती थेट छातीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

अरुण महाजन मंडप व्यवसायाशी संबंधित होता आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण होती. तो कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात होता. त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, आणि नेमका प्रकार काय घडला याबाबत सध्या पोलिस सखोल तपास करत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande