३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल
वॉशिंग्टन , 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांवर इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हा संघर्ष आता ३
३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली  युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल


वॉशिंग्टन , 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या तीव्र हल्ल्यांवर इराणदेखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हा संघर्ष आता ३०व्या दिवशी पोहोचला असून या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेने आपले विशाल युद्धनौक यूएसएस त्रिपोली तैनात केले आहे. सुमारे ३,५०० मरीन सैनिकांसह ते अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) क्षेत्रात दाखल झाले आहे.

ही युद्धनौका जपानमधील आपल्या मूळ बंदरातून रवाना झाली असून आता सेंटकॉम क्षेत्रात सक्रिय झाली आहे. यूएसएस त्रिपोली ही अमेरिका-श्रेणीतील उभयचर हल्लेखोर युद्धनौका असून आकाराने ती जवळपास विमानवाहू नौकेइतकी मोठी आहे. या जहाजावर हेलिकॉप्टर, MV-22 ऑस्प्रे विमान तसेच F-35B जॉइंट स्ट्राइक फायटर जेट्स तैनात करता येतात. जहाजावर त्रिपोली उभयचर तत्पर गट आणि 31वी मरीन एक्स्पिडिशनरी युनिट तैनात आहे.

हा संघर्ष सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल केवळ लष्करी ताकदीचे प्रदर्शन नसून संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईची तयारी मानली जात आहे. आधुनिक शस्त्रसामग्री आणि लढाऊ विमानांनी सज्ज असलेली ही नौका अमेरिकेची युद्धक्षमता अनेक पटींनी वाढवते. यावरून अमेरिका या संघर्षात आपला प्रभाव आणि पकड अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावत असल्याचे स्पष्ट होते.

या जहाजाच्या पश्चिम आशियात आगमनानंतर अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. आधीपासूनच या प्रदेशात यूएसएस निमित्झ आणि यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहू नौका तैनात आहेत. मात्र, यूएसएस जेराल्ड आर. फोर्डला अलीकडे लागलेल्या आगीमुळे आणि दुरुस्तीच्या कामामुळे पोर्ट ऑफ स्प्लिट येथे थांबवण्यात आले असून ते सुमारे एक वर्ष युद्ध क्षेत्रात कार्यरत राहू शकणार नाही.याशिवाय यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश ही विमानवाहू नौकाही नॉरफोकहून पश्चिम आशियाकडे रवाना झाली आहे. ती तैनात झाल्यास या भागातील अमेरिकन विमानवाहू नौकांची संख्या तीन होईल.

दरम्यान, सेंटकॉमने आपल्या पोस्टमध्ये इराणविरोधातील अमेरिकेच्या कारवायांची माहिती दिली आहे. पोस्टनुसार २८ फेब्रुवारीनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले असून ११,००० हून अधिक युद्धविमान उड्डाणे करण्यात आली आणि १५० पेक्षा जास्त इराणी जहाजांचे नुकसान किंवा विनाश करण्यात आला. तसेच अमेरिकेने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, क्षेपणास्त्र तळ, नौदल जहाजे आणि शस्त्रनिर्मिती केंद्रांना लक्ष्य केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande