

नाशिक, 30 मार्च (हिं.स.)
- नाशिक जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही अवकाळी ने तडाखा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्याबरोबरच शेजारी असलेल्या धुळे आणि नगर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाच्या वतीने राज्यामध्ये 4 एप्रिल पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मागील काही दिवसापासून सतत त्याने वाढणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक गर्मीने काहीसे हैराण झालेले होते. असे असताना नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील भगूर संसारी देवळाली कॅम्प या शहरालगत असलेल्या परिसरा बरोबरच सिन्नर येवला चांदवड या तालुक्यांमध्ये चांगला तडाखा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यातील मालेगाव देवळा व लगतच्या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला मोठमोठ्या गारा सह वादळी वारा आल्यामुळे काही ठिकाणी विद्युत पोल कोसळून गेले आहेत. या पावसामुळे गहू कांदा आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्याबरोबरच शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री व जवळच्या परिसरामध्ये सायंकाळी जोरदार पाऊस झाला तसेच लगतच्या नगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये देखील पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV