
लातूर, 30 मार्च (हिं.स.)।
दि. ३१ मार्च २०२६ रोजी महावीर जयंतीनिमित्त लातूर शहरातील सर्व कत्तलखाने तसेच मांस, मटण व चिकन विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संबंधित सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. त्यामुळे शहरात मांस विक्री व कत्तलखाने सुरू राहणार नाहीत.
तरी सर्व संबंधित दुकानदारांनी संबंधित दिवशी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis