चंद्रपूर : जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
चंद्रपूर, 04 मार्च (हिं.स.) चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन महसुली प्रश्नांचे त
चंद्रपूर : जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन


चंद्रपूर, 04 मार्च (हिं.स.) चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन महसुली प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर अशी शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने या शिबिरांद्वारे विविध तक्रारींचे निवारण तसेच शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या अनुषंगाने जिवती तालुक्यात खालीलप्रमाणे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे :

7 मार्च 2026 – शासकीय आश्रम शाळा, पाटण

14 मार्च 2026 – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेकामांडवा

10 एप्रिल 2026 – शासकीय आश्रम शाळा, पाटण

17 एप्रिल 2026 – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेकामांडवा

8 मे 2026 – विदर्भ कॉलेज, जिवती

15 मे 2026 – तहसील कार्यालय, जिवती

तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande