बीड - अत्याधुनिक फॉरेन्सीक व्हॅनचे लोकार्पण
बीड, 04 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई उपविभागात गुन्हे तपासाला अधिक गती आणि वैज्ञानिक आधार देण्यासाठी एका विशेष फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त श
Q


बीड, 04 मार्च, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई उपविभागात गुन्हे तपासाला अधिक गती आणि वैज्ञानिक आधार देण्यासाठी एका विशेष फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणी तज्ञांची उपस्थिती अनिवार्य असल्याने गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईला प्राप्त झालेल्या या व्हॅनचे (क्रमांक MH12ZC9852) उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या अत्याधुनिक वाहनात भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक सर्व साधने उपलब्ध आहेत. सहाय्यक रसायन विश्लेषक आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या पथकामुळे आता घटनास्थळावरूनच तांत्रिक पुरावे संकलित करणे सोपे होणार असून यामुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande