अंबाजोगाई जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर
बीड, 04 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या ३० एकर शासकीय जमिनीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी ४ कोटी ५ लक्ष ७९ हजार २५८ रुपयांच्या निधीला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार नमिता मुंदडा
अंबाजोगाई जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर


बीड, 04 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या ३० एकर शासकीय जमिनीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी ४ कोटी ५ लक्ष ७९ हजार २५८ रुपयांच्या निधीला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या कारागृहासाठी आणि जमिनीवर होणारी संभाव्य अतिक्रमणे रोखण्यासाठी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या या निधीतून सर्वे क्रमांक १७ मधील ३० एकर परिसरात मोठी संरक्षक भिंत उभारली जाणार असून जिल्हा कारागृह अधीक्षकांमार्फत या कामाची अंमलबजावणी होईल. बीड जिल्हा कारागृहावरील ताण कमी करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाच्या सुविधेसाठी हे जिल्हा कारागृह अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून या निधीमुळे जागेच्या संरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande