छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे करणार उद्घाटन छत्रपती संभाजीनगर, . ४ मार्च (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील लोकप्रशासन विभागाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपा
Q


राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे करणार उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, . ४ मार्च (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील लोकप्रशासन विभागाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. श्याम शिरसाठ यांनी दिली.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राचा विषय ‘कन्स्टिट्यूशनल ऍप्रोच फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट : सेलिब्रेटिंग ७५ इयर्स ऑफ कन्स्टिट्यूशनल इंडोमेंट’ असा आहे. राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हरिभाऊ बागडे हे प्रथमच विद्यापीठ परिसरात येत असून, उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची अध्यक्षता कुलगुरू डॉ. विजय फुलारी करणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवार, ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सिफार्ट सभागृहात पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच माजी विभागप्रमुख डॉ. पारसमल बोरा यांची प्रमुख उपस्थिती राहील.

याच कार्यक्रमात विभागातील प्राध्यापक डॉ. सतीश दांडगे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारच्या सत्रात चर्चासत्राचा समारोप होणार असून, विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

समारोप सत्रात मुंबई विद्यापीठ येथील प्रा. मृदुल निळे, डॉ. जितेंद्र वासनिक (नागपूर), प्राचार्य डॉ. अजय पाटील (लातूर), डॉ. डेसी शर्मा (जयपूर) तसेच डॉ. मलिकार्जुन हुगर (कर्नाटक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विभाग व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विभागप्रमुख डॉ. श्याम शिरसाठ हे चर्चासत्राचे समन्वयक असून डॉ. ज्योती धायगुडे या सह-समन्वयक आहेत. संशोधक विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी या चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande