लातूरमध्ये कबाले वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
महसूल समाधान शिबिर अभियानातून तोडगा अपेक्षित लातूर, 04 मार्च (हिं.स.) : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबवि
कबाले


महसूल समाधान शिबिर अभियानातून तोडगा अपेक्षित

लातूर, 04 मार्च (हिं.स.) : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार असून, महसूल विभागाशी निगडित विविध अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील प्रलंबित कबाल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका राजश्री धोत्रे-बाहेती यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.लातूर शहरातील प्रभाग क्र. १६ सह अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अद्याप कबाले देण्यात आलेले नाहीत. परिणामी संबंधित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून कबाले वाटपाची मागणी सातत्याने होत आहे.नगरपालिका निवडणुकीदरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी लातूर शहरातील नागरिकांना लवकरात लवकर कबाले वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. आता निवडणुका पार पडल्या असून महसूल समाधान शिबिर अभियानाची घोषणा झाल्यामुळे या माध्यमातून लातूरमधील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगरसेविका राजश्री धोत्रे-बाहेती यांनी तहसील प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेऊन कबाले वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.तसेच या अभियानाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, लाडक्या बहिणींची ई-केवायसी, शिधापत्रिकांमधील नावांची पडताळणी व दुरुस्ती तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, तहसीलदार सौदागर तांदळे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून कबाले वाटपासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande