परभणी : राजगोपालचारी उद्यानाची तातडीने दुरुस्ती करा – महापौर
परभणी, 04 मार्च (हिं.स.)। परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन संपूर्ण उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणावे, अशा स्पष्ट सूचना परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी दिल्या. महापौरांनी आज, बुधवारी उद्यानाच
राजगोपालचारी उद्यानाची तातडीने दुरुस्ती करा – महापौर सय्यद इकबाल यांच्या सूचना


परभणी, 04 मार्च (हिं.स.)। परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन संपूर्ण उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणावे, अशा स्पष्ट सूचना परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी दिल्या.

महापौरांनी आज, बुधवारी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करत संपूर्ण परिसराची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. उद्यानातील खेळणी साहित्य, घसरगुंडी व कारंज्यांची झालेली मोडतोड पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने सर्व साहित्याची दुरुस्ती, परिसराची साफसफाई आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी उद्यान निरीक्षक मोहम्मद अथर व अभियंता पवन देशमुख यांना पाचारण करून आवश्यक कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. उद्यानात अधिक झाडे लावणे, हिरवळ वाढविणे, नागरिकांचा अभिप्राय नोंदवही ठेवणे, सुरक्षा रक्षक व कर्मचारी संख्या वाढविणे, ठिकठिकाणी डस्टबिन बसविणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

एकूण 9 एकर क्षेत्रफळ असलेले हे शहरातील सर्वात मोठे उद्यान विकसित करण्यावर भर देत २० दिवसांत कामांमध्ये ठोस बदल दिसला पाहिजे, अन्यथा पुन्हा पाहणी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पत्नी डॉ. संप्रीया पाटील यांनीही उद्यानाला भेट देऊन सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावर महापौरांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देत सर्व कामे लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande