खोपोलीत ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ संकल्पनेचा शुभारंभ
रायगड, 04 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे
खोपोलीत ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ संकल्पनेचा शुभारंभ


रायगड, 04 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. स्वतंत्र शासकीय विभाग किंवा महामंडळामार्फत थेट लाभ न मिळणाऱ्या जाती-जमातींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या बाजारपेठेमुळे स्थानिक लघुउद्योजक, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर आणि विविध उत्पादकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. ‘अमृतपेठ’ ही केवळ विक्रीची बाजारपेठ नसून रोजगारनिर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाचे नेतृत्व युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वदेशी उद्योगांना चालना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजारपेठेत स्टॉल सहभाग, नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रतिनिधी शैलेश मराठे (९११२२२८७५९) किंवा अमित कुलकर्णी (९५४५०८६५५१) यांच्याशी संपर्क साधावा. स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार इच्छुक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘अमृतपेठ’ उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande