
अकोला, 04 मार्च (हिं.स.)। जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकासविभागातर्फे ६ मार्च रोजी ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षामीना यांच्या हस्ते दु. ३ वा. जिल्हा परिषद येथे होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अनितामेश्राम व जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. पुढेअशोक वाटिका, हुतात्मा स्मारक, नेहरू पार्क असा मार्ग असेल. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांनापुष्पहार अर्पण करून वॉकेथॉन रॅलीचा समारोप होईल. अधिकाधिक महिला व पुरूषांनी या वॉकेथॉनमध्येसहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनीकेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे