अकोल्यात बाभुळखेड-कालबाई परिसरात माती व वाळू चोरी, प्रकरण गंभीर
अकोला, 04 मार्च (हिं.स.)। अकोल्यातील बाळापूर शहराजवळील बाभुळखेड-कालबाई भागात आणि शहरातून गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या काठावर प्रचंड प्रमाणात माती व वाळू चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही लोक जेसीबीच्या साहाय्याने मातीची कपार
Photo


अकोला, 04 मार्च (हिं.स.)। अकोल्यातील बाळापूर शहराजवळील बाभुळखेड-कालबाई भागात आणि शहरातून गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या काठावर प्रचंड प्रमाणात माती व वाळू चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही लोक जेसीबीच्या साहाय्याने मातीची कपारी खोदून ट्रॅक्टर आणि ट्रकद्वारे माती व्यावसायिक उद्देशासाठी वाहून नेत आहेत.

म्हैस नदीच्या पाञातील वाळू देखील याच प्रकारे चोरी केली जात असल्याचे समजते. मात्र, बाळापूर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि गावस्तरीय कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. चोरी झालेल्या मातीमुळे रस्त्यांवर माती पसरल्याने दुचाकी व वाहन चालकांना अपघातांचा धोका निर्माण होत आहे, तर प्रशासनासाठीही आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे निवेदन देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची माहिती असूनही प्रशासनाची टीम घटनास्थळी नियमित तपासणीसाठी जाऊ शकत नाही.शेतकऱ्यांचा आरोप आहे की, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि माती चोरी करणाऱ्यांमध्ये साटे-लोटे असल्याचे चर्चेत आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे, अन्यथा निवेदनाद्वारे उच्च स्तरावर कारवाईसाठी पुढाकार घेतला जाईल.------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande