शास्ती अभय योजने अंतर्गत शास्तीच्या रकमेत 100 टक्के सूट!
अकोला, 04 मार्च (हिं.स.)।अकोला महानगरपापलिका प्रशासनाव्दारा शहरातील नागरिकांना त्यांचे थकित मालमत्ता कराचा भरणा करणे आर्थिक दृष्ट्या सोईचे व्हावे याकरिता दि. 14 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत तीन टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत
शास्ती अभय योजने अंतर्गत शास्तीच्या रकमेत 100 टक्के सूट!


अकोला, 04 मार्च (हिं.स.)।अकोला महानगरपापलिका प्रशासनाव्दारा शहरातील नागरिकांना त्यांचे थकित मालमत्ता कराचा भरणा करणे आर्थिक दृष्ट्या सोईचे व्हावे याकरिता दि. 14 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत तीन टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शास्तीच्या रकमेत 100 टक्के सूटचा आज शेवटचा दिवस असून थकित मालमत्ता धारकांनी याची नोंद घेऊन या अभय योजनेचा लाभ घ्यावा.

शहरातील मालमत्ता धारकांना कराचा भरणा करणे अधिक सोईचे व्हावे यासाठी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशीही मनपा मुख्य कार्यालय येथील मालमत्ता कर विभाग आणि पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही झोन कार्यलय हे सुरू राहणार आहे. याचसोबत शहरातील मालमत्ता धारकांनी आपला कराचा भरणा ऑनलाईन प्रणालीव्दारे केल्यास त्यांना सामान्य करात 3 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे, तरी शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी याची नोंद घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

शास्ती अभय योजनेचे उरलेले दोन टप्पे - टप्पा 2 - दि. 06/03/2026 ते दि. 20/03/2026 या कालावधीत थकित कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेत 90 टक्के सूट. टप्पा 3 - दि. 21/03/2026 ते दि. 31/03/2026 या कालावधीत थकित कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेत 85 टक्के सूट, या प्रमाणे आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन या संधीचा लाभ घेऊन आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा एकरकमी करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने आणि उपायुक्त विजय पारतवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande