डॉ.रमेश जाधव यांची मराठी विभागप्रमुखपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर, ४ मार्च (हिं.स.) । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी भाषा व वाङ्मय विभागप्रमुख म्हणून डॉ. रमेश आत्माराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. दासू वैद्य यांच्याकडून विभागप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारल
डॉ.रमेश जाधव यांची मराठी विभागप्रमुखपदी नियुक्ती


छत्रपती संभाजीनगर, ४ मार्च (हिं.स.) । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी भाषा व वाङ्मय विभागप्रमुख म्हणून डॉ. रमेश आत्माराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. दासू वैद्य यांच्याकडून विभागप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

डॉ. रमेश जाधव हे १९९५ ते २००८ या कालावधीत मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २००८ पासून ते विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक, प्राध्यापक आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यापन सेवेला एकूण ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

यापूर्वी त्यांनी एनएसएस जिल्हा समन्वयक तसेच अधिसभा सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

डॉ. जाधव यांच्या लेखन कार्यात आतापर्यंत दहा ग्रंथ प्रकाशित झाले असून सुमारे पन्नास शोधनिबंध विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. ते महाराष्ट्रातील विविध नामांकित विद्यापीठांमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करतात. ‘गारेवाणी’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. तसेच त्यांनी मेजर रिसर्च प्रोजेक्टही पूर्ण केलेला आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे मराठी विभागाच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande