पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद
सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। पंढरपूर मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिर परिसरातील बाधित नागरिक मोठ्या संख्
Wari 1 Solapur


सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। पंढरपूर मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिर परिसरातील बाधित नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. महाद्वारातील नामदेव पायरी येथे माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज आदींच्या हस्ते पूजन करून मोर्चाला सुरवात झाली. ‘एकच जिद्द - कॉरिडॉर रद्द’, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती की, शहरात वापराविना पडलेल्या शासकीय जागा तसेच अतिक्रमित जागांवर कॉरिडॉरसारखे प्रकल्प राबवावेत. वारकरी बांधवांना सुविधा देणारी बाधितांची घरे पाडू नयेत आणि कॉरिडॉर सरकारी जागांवरच उभारावा.मोर्चा तहसील कार्यालयाकडे जात असताना विविध चौकांमध्ये भाषणे झाली. शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात मोर्चा तहसीलदार कार्यालयात पोचला. यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, नगरसेवक राहुल शिंदे, नाईक किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज आदींनी आपली मते मांडली. मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. वट्टमवार ताई, डॉ. प्राजक्ता बेणारे, सौ. बिडकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande