अमरावती : छत्री तलाव हत्या प्रकरणी 8 पैकी 4 आरोपी ताब्यात
अमरावती, 05 मार्च (हिं.स.)। अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखा यांनी अत्यंत क्लिष्ट व नियोजनबद्ध खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत कौतुकास्पद कामगिरी बजावली. छत्री तलाव परिसरातील जंगलातील विहिरीत सापडलेला मृतदेह हा अमर मोतीलाल व्यास (वय ३४,
छत्री तलाव खूनप्रकरणाचा उलगडा; आठ आरोपी निष्पन्न, चौघे ताब्यात


अमरावती, 05 मार्च (हिं.स.)। अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखा यांनी अत्यंत क्लिष्ट व नियोजनबद्ध खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत कौतुकास्पद कामगिरी बजावली. छत्री तलाव परिसरातील जंगलातील विहिरीत सापडलेला मृतदेह हा अमर मोतीलाल व्यास (वय ३४, रा. महादेवखोरी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. १ फेब्रुवारी रोजी ही घटना पोलीस स्टेशन फेजरपूरा हद्दीत उघडकीस आली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाल्याचे व स्टॅबींगच्या जखमा आढळल्याने घातपात स्पष्ट झाला. तांत्रिक पुरावे नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हलली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून तपास करण्यात आला. एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन आरोपी आधीपासून नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या खून प्रकरणात कारागृहात आहेत. पुढील तपास सुरू आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande