बीड - बर्दापूर हद्दीत धाडसी कारवाई; १० लाखांच्या गांजासह आरोपी अटकेत
बीड, 05 मार्च, (हिं.स.) - अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३३ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख ८०० रुपये इतकी आहे. गोपन
बीड - बर्दापूर हद्दीत धाडसी कारवाई; १० लाखांच्या गांजासह आरोपी अटकेत


बीड, 05 मार्च, (हिं.स.) - अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३३ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख ८०० रुपये इतकी आहे. गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मूर्ती फाट्याजवळ सापळा रचून मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेतले, तर उर्वरीत दोघे फरार झाले.

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पंचनामा केला असून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे आणि त्यांच्या विशेष पथकाचा सहभाग होता. या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण अंबाजोगाई परिसरातून पोलीस दलाचे विशेष कौतुक होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande