इराणी जहाजावरील हल्ल्यानंतर अब्बास अराघची यांची अमेरिकेला उघड धमकी
तेहरान, 05 मार्च (हिं.स.)।श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकेने पाणबुडीमधून हल्ला करून इराणचे एक जहाज बुडवले. या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला उघड इशारा दिला आहे. अब्बास अ
इराणी जहाजावरील हल्ल्यानंतर अब्बास अरघची यांची अमेरिकेला उघड धमकी


तेहरान, 05 मार्च (हिं.स.)।श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकेने पाणबुडीमधून हल्ला करून इराणचे एक जहाज बुडवले. या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला उघड इशारा दिला आहे.

अब्बास अराघची यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, अमेरिकेला या हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 2,000 मैल दूर समुद्रात एक जघन्य गुन्हा केला आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय नौदलाचे पाहुणे असलेल्या सुमारे 130 नौसैनिकांना घेऊन जाणाऱ्या फ्रिगेट डेनावर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ला करण्यात आला. त्यांनी पुढे लिहिले, “माझे शब्द लक्षात ठेवा, अमेरिकेला या कृत्याबद्दल गंभीर पश्चात्ताप करावा लागेल.”

हिंद महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणच्या नौदलाचे फ्रिगेट आयआरआयएस डेना 4 मार्चच्या पहाटे बुडाले. अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खोल समुद्रात घडलेली ही पहिली मोठी नौदल घटना मानली जात आहे. त्यामुळे हा संघर्ष भारताच्या सागरी क्षेत्रापर्यंत पसरण्याची शक्यता वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.माहितीनुसार हे जहाज श्रीलंकेतील गाले शहरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल दक्षिणेला बुडाले. हे युद्धनौकावाहन नुकतेच विशाखापट्टणम येथे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलान 2026 आणि इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाकडे परतत होते.

श्रीलंकन नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार हा हल्ला पाणबुडीमधून डागण्यात आलेल्या टॉरपीडोने करण्यात आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 5:08 ते 5:30 दरम्यान जहाजाकडून संकट संदेश पाठवण्यात आला होता. या संदेशात समुद्राखाली झालेल्या मोठ्या स्फोटामुळे जहाजाला गंभीर नुकसान झाले असून त्यात वेगाने पाणी भरत असल्याची माहिती देण्यात आली होती. काही मिनिटांतच हे जहाज रडारवरून गायब झाले आणि बुडाले.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पुष्टी केली की अमेरिकन पाणबुडीने डागलेल्या टॉरपीडोने या युद्धनौकेला लक्ष्य केले होते. गाले येथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बचाव पथकाला आतापर्यंत 87 मृतदेह सापडले आहेत. 32 नौसैनिकांना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर जहाजावर असलेल्या सुमारे 180 लोकांपैकी जवळपास 60 जण अद्याप बेपत्ता आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande