पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून कौतुक
नवी दिल्ली , 05 मार्च (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक करत पंतप्रधान मोदींना एक विलक्षण व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. त्यांनी युपीआय आणि डिजिटल सुधारणांना भारताची मोठी उपलब्धी म्हणून वर्णन क
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून कौतुक


नवी दिल्ली , 05 मार्च (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक करत पंतप्रधान मोदींना एक विलक्षण व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. त्यांनी युपीआय आणि डिजिटल सुधारणांना भारताची मोठी उपलब्धी म्हणून वर्णन केले आणि भारताचे खूप कौतुक केले.

कार्नी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आयोजित एका सेमिनारमध्ये भारतातील आपल्या मागील दौऱ्याचा आणि पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीचा अनुभवही शेअर केला. त्यांनी सांगितले की मोदींचे कामाप्रती असलेले समर्पण आश्चर्यकारक आहे. मागील २५ वर्षांत त्यांनी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना असो किंवा आता देशाचे पंतप्रधान असताना, त्यांनी सातत्याने काम केले आहे.

कार्नी यांनी सांगितले की मोदी दर आठवड्याच्या शेवटी निवडणूक प्रचारासाठी जातात आणि त्यांच्या सभांमध्ये अडीच लाखांहून अधिक लोक सहभागी होतात. त्यांनी मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दलही भाष्य केले. कार्नी यांच्या मते, मोदींचे संपूर्ण लक्ष गावातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर असते. ते सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यावर विश्वास ठेवतात.

कार्नी यांनी भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणाली आणि यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) चे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की मोदींनी अशी प्रणाली निर्माण केली आहे जी कोणीही स्वीकारू शकते.या तंत्रज्ञानामुळे पैसा कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लोकांच्या खात्यात पोहोचतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची शक्यता कमी होते. या बदलामुळे कोट्यवधी लोक देशाच्या मुख्य अर्थव्यवस्थेशी जोडले गेले आहेत.

कार्नी यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी होता. या दरम्यान तंत्रज्ञान आणि संस्कृतीसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यांनी याला भागीदारीचा नवा टप्पा असे संबोधले.कार्नी यांनी विश्वास व्यक्त केला की कॅनडा भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात पूर्ण मदत करेल. कॅनडातील कॅमेको या कंपनीने भारताला युरेनियम पुरवठा करण्यासाठी दीर्घकालीन करार केला आहे.

दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्याबाबतही चर्चा सुरू आहे. भारत आणि कॅनडा त्यांच्या जुन्या संरक्षण कराराचे नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेत आहेत. कार्नी यांनी सांगितले की सुमारे २० लाख भारतीय वंशाचे लोक कॅनडामध्ये राहतात. तसेच दरवर्षी हजारो लोक दोन्ही देशांदरम्यान प्रवास करतात. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande