नाशिकमध्ये महिलांसाठी मोफत प्लम्बिंग मेंटेनन्स प्रशिक्षण
नाशिक, 05 मार्च (हिं.स.) - गळक्या नळाचे वॉशर कसे बदलावे, त्यामधील गळतीमागे अजून कोणती कारणे आहेत, घरामधील प्लंबिंग व सांडपाण्याचे नियोजन कसे असते, प्लम्बिंगच्या विविध साहित्याची ओळख अशी उपयुक्त माहिती महिलांना देण्यासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशनच
नाशिकमध्ये महिलांसाठी मोफत प्लम्बिंग मेंटेनन्स प्रशिक्षण


नाशिक, 05 मार्च (हिं.स.) - गळक्या नळाचे वॉशर कसे बदलावे, त्यामधील गळतीमागे अजून कोणती कारणे आहेत, घरामधील प्लंबिंग व सांडपाण्याचे नियोजन कसे असते, प्लम्बिंगच्या विविध साहित्याची ओळख अशी उपयुक्त माहिती महिलांना देण्यासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक चॅप्टरच्या वतीने महिलांसाठी मोफत प्लंबिंग मेंटेनन्स प्रशिक्षणाचे 7 मार्च, शनिवार रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 वा.पर्यंत सेमिनार हॉल, गुरु गोबिंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,नाशिक येथे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष विक्रम खैरनार यांनी दिली.

दरवर्षी हजारो लिटर पाणी हे केवळ लहान लहान पाणी गळतीने वाया जाते. यामध्ये नळ, फ्लश टॅन्क्स, घरावरील टाक्या यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेकदा छोट्या कामांसाठी प्लंबर येत नाहीत किंवा नोकरदार महिलांच्या वेळेत तो उपलब्ध नसतो. यामुळे हि छोटी मोठी कामे जर महिलांनाच करता आली तर पाण्याचा अपव्यय टळेल हेच ओळखून गेल्या 13 वर्षापासून इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक चॅप्टरच्या वतीने महिलांसाठी हे मोफत प्लंबिंग मेंटेनन्स प्रशिक्षण देण्यात येते.सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी साठी 7558394911 या क्रमांकावर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande