लातूर - अंधोरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
लातूर, 05 मार्च, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आ
अंधोरी


लातूर, 05 मार्च, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंधोरी येथील रहिवासी आरोपी लिंबाजी रामराव येलणारे याने गावाच्या उत्तर दिशेला असलेल्या आपल्या जनावरांच्या आखाड्यात (गोठ्यात) पीडित मुलीला नेले. तिथे त्याने वाईट उद्देशाने पीडितेचा हात धरून तिला बळजबरीने स्वतःच्या मांडीवर बसवले. आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला, तसेच तिला जीवे मारण्याची भीती दाखवून चुकीची कृत्ये करण्याचा प्रयत्न केला.

या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या आईने किनगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी लिंबाजी येलणारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि पोक्सो कायदा २०१२ च्या कलम ८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ नुसार दाखल केला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे

या प्रकरणाचा अधिक तपास लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए. डोके हे स्वतः करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande