छ. संभाजीनगर - भाजपतर्फे 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान'
छत्रपती संभाजीनगर, 07 मार्च (हिं.स.)।भारतीय जनता पक्षातर्फे ''पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान'' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसाठी मंडळ वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . चिकलठाणा येथील भाजप
Q


छत्रपती संभाजीनगर, 07 मार्च (हिं.स.)।भारतीय जनता पक्षातर्फे 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसाठी मंडळ वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .

चिकलठाणा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात ही कार्यशाळा संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिव प्रकाश, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार अजित गोपछडे, डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रेखा कुलकर्णी, प्रदेशचिटणीस वर्षा डहाळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, उपाध्यक्ष चैतन्य देशमुख, मनोज पांगारकर, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत संघटन व कार्यविस्तार, समाज माध्यम व एआयचा प्रभावी वापर, बुथ व्यवस्थापन, मन की बात यासह एकूण सात विषयावर भाजप नेते व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रसेवा आणि जनसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्तेच पक्ष संघटनेची खरी ऊर्जा आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून भाजपा परिवार आगामी काळात यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande