छ. संभाजीनगर : स्थायी समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा १२ मार्च रोजी
छत्रपती संभाजीनगर, 07 मार्च (हिं.स.) – छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक १२ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजि
छ. संभाजीनगर : स्थायी समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा १२ मार्च रोजी


छत्रपती संभाजीनगर, 07 मार्च (हिं.स.) – छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक १२ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या सभेचे पिठासन अधिकारी असणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीसह शालेय समिती, आरोग्य समिती, समाजकल्याण समिती, शहर सुधार समिती आणि महिला व बालकल्याण समिती या पाच विषय समितींच्या सदस्यांची नियुक्ती गुरुवारी (पाच मार्च) रोजी करण्यात आली. त्यानंतर सभापती निवडीसाठी पालिकेच्या सचिव कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून विशेष सभेचे आयोजन करण्याची विनंती करण्यात आली होती.

विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार, १२ मार्च रोजी विशेष सभा आयोजित केली जाणार असून, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहतील.

महापालिकेच्या रचनेत स्थायी समितीचे सभापतीपद महत्वाचे मानले जाते, त्यामुळे या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे आठ, 'एमआयएम'चे चार, शिवसेनेचे दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि लोकसेवा विकास आघाडीचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande