
लातूर, 08 मार्च (हिं.स.)। लातूर येथे आयोजित बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद गटाच्या संघटनात्मक निवडी सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या. यामध्ये रामचंद्र तिरुके यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी, महादेव साळुंके यांची उपगटनेतेपदी, तानाजी बिरादार यांची पक्ष प्रतोद तसेच अमर पाटील यांची सहप्रतोद म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गट अधिक बळकट होईल आणि जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, भाजप लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis