
नांदेड, 08 मार्च (हिं.स.)।
कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवर असलेल्या
महापारेषण कंपनीच्या १३२ के. व्ही. परिसरात स्पार्किंगमुळे मोठी आग लागल्याची घटना घडली असून, यात जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील गवत व झाडे जळून खाक झाली आहेत.
कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवर महापारेषण कंपनीचे १३२ के.व्ही. केंद्र आहे. या केंद्रातून जारीकोट धर्माबाद, कुंडलवाडी शहराला वीजपुरवठा करण्यात येतो. स्पार्किंगमुळे मोठी आग लागल्याची घटना घडली असून, यात जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील झाडे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी चालक नामदेव वाघमारे, फायरमन वडेन्ना मदिकुंटावार, धोंडीबा वाघमारे, अजय वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, महावितरण कंपनीचे सुरेश गढवा यांनी घटनास्थळी भेट दिली. महापारेषण कंपनीचे सहायक अभियंता संजय चिन्मलवार, संतोष पेद्दापुरे, डी. व्ही. परळे व कुंड यांनी १३२ के.व्ही. मधून जाणारा वीजपुरवठा वेळीच बंद केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis