
परभणी, 08 मार्च (हिं.स.)। परभणी शहरातील गव्हाणे चौक येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजीवनी प्रसाद मगर यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय दामिनी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून नाशिक येथे होणाऱ्या विशेष समारंभात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
बालरोगतज्ज्ञ म्हणून समाजात उल्लेखनीय सेवा देत बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. मगर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिजीत कुलकर्णी, अनिल नाथरेकर, डॉ. श्रीकांत मुदखेडकर, अजय वट्टमवार तसेच सुरेंद्र माणकेश्वरकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis