
परभणी, 09 मार्च (हिं.स.)।
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील नियमबाह्य वातानुकूलित यंत्रणा काढण्याबाबत ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांनी सोमवारी (दि. ९) नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी तत्परता दाखवत भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाहोटी यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis