उत्तराखंड : राज्यपालांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग
श्रीनगर (पौडी गढवाल) 08 मार्च (हिं.स.) : उत्तराखंडचे राज्यपाल सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांच्या हेलिकॉप्टरची रविवारी अचानक आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने खब
उत्तराखंडच्या राज्यपालांचे हेलिकॉप्टर आपात्कालिन परिस्थितीत लँड


श्रीनगर (पौडी गढवाल) 08 मार्च (हिं.स.) : उत्तराखंडचे राज्यपाल सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांच्या हेलिकॉप्टरची रविवारी अचानक आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पौडी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथे ते उतरवण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पायलटने तत्काळ सुरक्षित ठिकाणी आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हेलिकॉप्टर श्रीनगर गढवाल येथील जीवीके हेलीपॅडवर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. हेलिकॉप्टर उतरल्याबरोबर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार राज्यपाल गुरमीत सिंह यांना तात्काळ श्रीनगर येथील पोलिस गेस्ट हाऊसमध्ये हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान पायलटच्या समयसूचकतेमुळे तत्काळ आपात्कालिन लँडिंग केल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande