मनोज म्हस्के यांची महाराष्ट्राच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक
Volleyball coach Manoj Mhaske appointed as assistant coach of Maharashtra team for national competition.
Volleyball coach Manoj Mhaske


नाशिक, 08 मार्च (हिं.स.)।

: नाशिकचे राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू तथा प्रशिक्षक मनोज म्हस्के यांची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या २१ वर्षे वयोगटाच्या महाराष्टाच्या मुलींच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात अली आहे. भुवनेश्वर, ओडीसा येथे १५ मार्च ते २० मार्च दरम्यान २१ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षण शिबीर वर्धा येथे सुरु झाले आहे. तेथून संघ भुवनेश्वर, ओडिसा येथे रवाना होणार आहे. खेळाडूंचा सराव योग्य दिशेने सुरु असून खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वास मनोज म्हस्के यांनी व्यक्त केला. या पूर्वी मॅनेज म्हस्के यांनी पश्चिम बंगाल, बरद्वान येथे आयोजित १८ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तसेच मध्यप्रदेश, भोपाळ येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धामध्येमुलीच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. मनोज म्हस्के यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील, सचिव विरल शहा, सहसचिव गजानन जिवतोडे, नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आनंद खरे, सचिव रामदास होते यांनी अभिनंदन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande