
नांदेड, 08 मार्च (हिं.स.)।साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिराच्या स्कायवॉकच्या कामासाठी अडथळा निर्माण होत असल्याने चार महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी दुकाने स्थलांतरित करूनही कामाला म्हणावी तशी गती आली नाही. आतापर्यंत अपर आणि लोअर स्टेशनचे काम झाले असून आणखी कॉलम उभारणीसह अन्य काम बाकी आहे.
दिव्यांग, क्योवृद्ध, बालगोपाल व गरोदर माता यांना जाणे-येणे सुलभव्हावे म्हणून केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लिफ्ट्सह
स्कायवॉक हा प्रकल्प मंजूर करून आवश्यक तो ५३ कोटींचा निधी मिळवून दिला. आवश्यक अशा वन विभागाच्या जटिल परवानग्याही मिळवून दिल्या. सदर कामाची निविदा नागपूर येथील गुरुबवशानी यांच्या खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली. तीन वर्षांपूर्वी मंत्री गडकरी यांनी या कामाचे भूमिपूजनही केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी हे काम दीड वर्षात पूर्ण करण्याऐवजी एका वर्षात पूर्ण केल्यास मी तुम्हाला आणखी मोठ्या स्वरूपाचे काम देतो, असे अभिवचन दिले होते. परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटूनही काम पूर्ण होणे तर सोडाच, साधे पायाभूत पिलर्ससुद्धा पूर्ण झालेले नाहीत.माहूर गडावरील श्री रेणुकादेवी मंदिराच्या स्कायवॉकचे काम संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत अप्पर आणि लोअर स्टेशनचे काम झाले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis