भटाळा प्रागैतिहासिक स्थळावर बेकायदेशीर खाणकामामुळे धोका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल नागपूर, 09 मार्च (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वीचे प्रागैतिहासिक वारसा स्थळ सध्या गंभीर धोक्याला सामोरे आहे. नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांच्या इशाऱ्यान
भटाळा प्रागैतिहासिक स्थळ


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल

नागपूर, 09 मार्च (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वीचे प्रागैतिहासिक वारसा स्थळ सध्या गंभीर धोक्याला सामोरे आहे. नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांच्या इशाऱ्यानुसार, बेकायदेशीर खाणकाम आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे भारताच्या मानवी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली. सोमवारी ऍड. भानुदास कुलकर्णी यांना न्यायालयिन मित्र (अम्यॅकस क्युरी) म्हणून नियुक्त केले असून, दोन आठवड्यांच्या आत याचिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संशोधकांनी भटाळा स्थळाची तुलना चंद्रपूरमधील प्रसिद्ध पापामिया टेकडीशी केली आहे. पापामिया टेकडी हे भारतातील सर्वात जुन्या पाषाणयुगीन स्थळांपैकी एक असून, वाढत्या शहरीकरण आणि बांधकामांमुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती आता भटाळाची झाली असून, येथील लाल क्वार्टझाइट कलाकृती, हाताची कुऱ्हाडी आणि आदिम दगडी अवजारे खाणकामाच्या स्फोटांमुळे धोक्यात आली आहेत.

भटाळा येथील भवानी मंदिर पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या यादीत संरक्षित स्मारक म्हणून नोंदवलेले आहे. 'प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष (एएमएएसआर) कायदा 2010' नुसार या भागात कोणत्याही प्रकारचे खाणकाम किंवा स्फोट पूर्णपणे बंदी आहेत. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही काम करता येत नाही. संशोधकांचा आरोप आहे की, मंदिराच्या 300 मीटरच्या परिघात मोठ्या प्रमाणात खाणकाम आणि स्फोट सुरू आहेत. शिवाय संरक्षित क्षेत्राची माहिती देणारे वैधानिक फलकही तिथून हटवण्यात आले आहेत.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande