भोंदू अशोक खरात प्रकरणात १६० जीबी डिजिटल डेटा जप्त
प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाला शिर्डी पोलिसांची नोटीस नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)। - नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुर
160 GB digital data seized


प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाला शिर्डी पोलिसांची नोटीस

नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।

- नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये आता रूपाली चाकणकर यांची बहीण व तिच्या मुलगा यांचे खाते सापडले असल्याने शिर्डी पोलिसांनी जबाब साठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे अशोक खरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांतून मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमधील ३२ जीबी डेटा, त्यामधील १९ स्वतंत्र फोल्डर्स, ६४ जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली. या सर्व उपकरणांतील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासली जात असून, एकूण १६० जीबीपेक्षा अधिक डेटा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.या डिजिटल पुराव्यांमधून नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील उघड झाला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याचे ‘A’, ‘B’ आणि ‘C’ अशा कोडमध्ये वर्गीकरण केले असून, ‘A’ गटातील माहिती अत्यंत संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित गोळा केले जात आहेत. डिजिटल माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवे पैल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर तपासासाठी अधिक वेळ देत न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली.

दरम्यान, शिर्डी पोलिसांनीभोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना आज बजावली आहे. भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली होती. समता पतसंस्थेत अनेक खाती अशी आहेत, जी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहेत, मात्र नॉमीनी स्वतः अशोक खरात हाच आहे. या खात्यांवरून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.

प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावेही समता पतसंस्थेत चार खाती आहेत. या सर्व खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 33 खातेदारांनी जबाब नोंदवले आहेत. प्रतिभा चाकणकर यांनाही जबाब देण्यासाठी शिर्डीत पोलीस ठाण्यात आता हजर राहावं लागणार आहे. शिर्डी पोलीसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्यांवर पोस्टाने नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे.

अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात

एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande