पुण्यात मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन : दोन पोलिस हवालदारांचे तडकाफडकी निलंबन
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेल्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी त्यांची नावे आहेत. एकाने भरतीसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन
पुण्यात मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन : दोन पोलिस हवालदारांचे तडकाफडकी निलंबन


पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेल्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी त्यांची नावे आहेत.

एकाने भरतीसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन करून धिंगाणा घातला, तर दुसऱ्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडवले. या दोन्ही हवालदारांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले.पहिली घटना 21 मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात घडली. पुणे शहर पोलिस भरती 2024-25 ची लेखी परीक्षा सुरू असताना हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती इमारत क्रमांक 1 मधील सेक्टर 1 च्या बंदोबस्तासाठी करण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या बंदोबस्ताची अचानक पाहणी केली. त्यावेळी जाधव हे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande