शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स ९१८ अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज दमदार पुनरागमन करत मजबुतीने व्यवहाराची सांगता केली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली, तर निफ्टीनेही दिवसाभरात उल्लेखनीय वाढ नोंदव
Stock Market Closing


नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज दमदार पुनरागमन करत मजबुतीने व्यवहाराची सांगता केली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली, तर निफ्टीनेही दिवसाभरात उल्लेखनीय वाढ नोंदवली. पश्चिम आशियात शांतता चर्चेची शक्यता, मजबूत जागतिक संकेत आणि विशेषतः फायनान्शियल क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी यामुळे बाजारात सकाळपासूनच सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

आज व्यवहाराची सुरुवातही मजबुतीने झाली. सुरुवातीला खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये चढ-उतार सुरू असला, तरी नंतर खरेदीदारांनी आघाडी घेतली आणि बाजाराने वेग पकडला. दिवसअखेर सेन्सेक्स ९१८.६० अंकांनी वाढून ७७,५५०.२५ या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी २७५.५० अंकांच्या वाढीसह २४,०५०.६० वर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने ९९० अंकांची तर निफ्टीने जवळपास २९९ अंकांची उसळी घेतली होती.

आजच्या व्यवहारात ऑटोमोबाईल, कॅपिटल गुड्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. याशिवाय रिअल्टी, बँकिंग, एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल, ऑइल अँड गॅस आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज निर्देशांकही वाढीसह बंद झाले. मात्र आयटी आणि टेक क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स जवळपास १.९१ टक्क्यांनी घसरला.

ब्रॉडर मार्केटमध्येही तेजी कायम राहिली. मिडकॅप इंडेक्स १.५२ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप इंडेक्सने १.६५ टक्क्यांची झेप घेतली. बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ६.५१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ४५१.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

आजच्या व्यवहारात एशियन पेंट्स, आयशर मोटर्स, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स आणि बजाज ऑटो हे प्रमुख गेनर्स ठरले. तर कोल इंडिया, सन फार्मास्युटिकल्स, इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. एकूणच, मजबूत खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande